लगीन घटिकाजवळ आलेल्या तरुणीने संपवली जीवनयात्रा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील अंजाळे गावातील लग्न घटिकाजवळ आलेल्या तरूणीने आपल्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना उघडकीस आली आहे.  तरूणीने अचानक आत्महत्याचे पाऊल उचलल्याने  गावात शोककळा पसरली असून , याबाबत यावल पोलीस स्टेशनमध्ये अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की , मिनल निवृत्ती भागवत ( वय २३ वर्ष रा. नविन प्लाट क्षेत्र अंजाळे ता. यावल) या तरुणीने आज शनिवार दि. १५ आक्टोबर  रोजी सकाळी १oवाजेच्या पुर्वी आपल्या राहत्या घरातील छ्ताच्या लोखंडी पाईपला ओढणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे . या बाबत मयत तरूणीचे वडील निवृत्ती किसन भागवत (वय ५८ वर्ष) यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अ.मृ .र ६५ / २०२२ प्रमाणे अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी हे करीत आहे. सदरच्या आत्महत्या केलेल्या तरुणीचे लग्न जुळले होते व विवाह दिवाळी नंतर होणार होते अशी माहीती मिळत आहे.  दरम्यान मयत तरूणीचे मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ . राजेश पवन जैन यांनी केले.

 

Protected Content