जळगावात वेगवेगळ्या घटनेत दोघांची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । वेगवेगळ्या घटनेत शहरात प्रौढांसह तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.सोमवारी दुपारी हे प्रकार समोर आले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहाडी शिवारातील उमेश पार्कमधील विशाल कैलास जाधव (वय-१९) हा तरुण कुटुंबातील सदस्यासह मोहाडी शिवारात उमेश पार्कमध्ये राहत होता. घरात एकटा असताना त्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळले. त्याचे भाऊ घरी आले असता प्रकार उघडकीस आला. विशाल यावर्षी बारावीच्या वर्गात गेला होता. त्याचे वडील कैलास जाधव हे मेहरुण तलाव परिसरातील वसाहतमध्ये कपडे इस्रीचा व्यवसाय करतात.त्याच्या पश्चात आई, वडील, दोन मोठे भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. जिल्हा रुग्णालयातुन डॉ. जाधव यांनी खबर रामानंद पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी विजय खेरें यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला.

प्रौढाने संपविली जीवनयात्रा
राजेश अमृतलाल चौधरी (५१) हे कुटूंबासह प्रतापनगरातील भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. नैरास्यातून दुपारी दोन वाजता गळफास घेवून त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान त्यांची पत्नी, मोठा मुलगा दवाखान्याच्या कामानिमित्त त्यांच्या मूळ गावी भुसावळ येथे गेले होते. तर घरातील लहान मुलगा दुसऱ्या खोलीत होता. ही घटना काही वेळाने त्याच्या लक्षात आली. राजेश चौधरी यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डाँकटरानी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी डाँ दीपक जाधव यांनी दिलेल्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Protected Content