लॉकडाऊन: व्यापारी संकुलातील दुकानदारांचे तीन महिन्याचे भाडे आकारू नये; रा.काँ.ची मागणी

सावदा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने नगरपालिकेने व्यापार संकुलातील दुकानदारांकडून तीन महिन्याचे भाडे आकारणी करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगरपालिकेला निवेदन देवून केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यासह देशात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने सर्व मार्केटमधील दुकाने बंद आहे. व्यवसाय बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांनी आर्थीक झळ बसली आहे. व्यापारी संकुलात छोटे-मोठे व्यापारींना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सावदा नगरपालिकेने व्यापारी व दुकानदारांकडून गेल्या तीन महिन्याचे व्यापारी संकुलातील दुकानांच्या भाडे आकारणी करू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष कुशल जावळे व युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव वानखेडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Protected Content