तापी नदीत बुडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

चोपडा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील तापी नदीत ३१ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी २५ जून रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आले आहे. याबाबत दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कावसिंग पाहाड्या बारेला वय ३१ रा. सेंधवा जि. बडवाणी मध्यप्रदेश ह.मु. चोपडा शिवार, चोपडा असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कावसिंग बारेला हा तरूण आपल्या कुटुंबासह चोपडा शिवारात वास्तव्याला होता. गावाजवळ असलेल्या तापी नदीत त्यांचा पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून दुदैवी मृत्यू झाला. परिसरातील पट्टीचे पोहणाऱ्या तरूणांनी त्याला बाहेर काढून खासगी वाहनातून अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याबाबत दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.

Protected Content