जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांची धाड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील ट्राफीक गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा जुगार अड्ड्यावर जिल्हापेठ पोलिसांनी रविवारी ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करीत रोख रकमेसह सट्ट्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी सुभाष रामभाऊ सोनवणे (वय- ६२, रा. शनिपेठ, जळगाव) याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहूनगर परिसरातील ट्राफीक गार्डन परिसरात एका झाडाखाली सट्टा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यावरून सदर ठिकाणी कारवाई करण्यात आली असता तेथे सुभाष सोनवणे हा सट्टा जुगार चालवित असल्याचे आडळून आले. त्याच्याकडून रोख १९० रुपयांसह सट्ट्याचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी पोकॉ प्रवीण पाटील यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनवणेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content