लोखंडी गुप्ती घेवून दहशत माजविणारा पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेत आहे. ही कारवाई सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता केली आहे. त्याच्याकडून लोखंडे गुप्ती हस्तगत केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर प्रशांत पाटील वय-२१, रा. इदगाव ता.जि.जळगाव संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमी परिसरात एक तरुण हातात लोखंडी गुप्ती घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान पथकाने सोमवारी १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शिवाजीनगर परिसरातील स्मशानभूमीजवळ कारवाई करत संशयित आरोपी मयूर पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रतन गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर प्रशांत पाटील यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रफुल्ल धांडे, पोलीस नाईक किशोर निकुंभ, पोलीस कॉन्स्टेबल तेजस मराठे, अमोल ठाकूर, रतन गीते यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Protected Content