रोटरी क्लब स्टारच्या उपक्रमांना सदैव मदतीची तयारी – उपमहापौर

 

जळगाव : प्रतिनिधी । शहरात रोटरी क्लबच्या समाजाभिमुख  उपक्रमांना महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाची सदैव मदतीची तयारी असेल असे आज  उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी सांगितले

शिवाजीनगरातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरण केलेल्या कामाच्या लोकार्पणानंतर  उपमहापौर कुलभूषण पाटील  पत्रकारांशी बोलत होते . ते पुढे म्हणाले की शहरात शिवाजीनगरातील स्मशानभूमीच्या सुशोभीकरणाचे हे काम बऱ्याच अडचणींना तोंड देत रोटरी क्लबच्या सर्व सहकाऱ्यांनी ठरल्याप्रमाणे फक्त २० दिवसात पूर्ण करून दिले  समाजाचे आपण देणे लागतो हा रोटरी क्लबचा उदात्त सेवाभाव समाजासाठी खूप महत्वाचा आहे त्यामुळे मी आभार मानण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करीत असलो तरी खरे म्हणजे मी त्यांच्या सदैव ऋणात राहीन आयुक्तांनीही आता ग्वाही दिली की शहरात रोटरी क्लबच्या समाजाभिमुख  उपक्रमांना महापालिकेचे पदाधिकारी आणि प्रशासनाची सदैव मदतीची तयारी असेल तशीच ग्वाही मलापण देताना आनंद होत आहे , असेही ते म्हणाले .

 

महापौरांकडूनही आभार

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनीही रोटरी क्लबचे आभार मानले . त्या म्हणाल्या की , अवघ्या २० दिवसात खूप मोठे हे काम झाले आहे आता या स्मशानभूमीचे नामकरण अमरधाम असे झाल्याचे मी जाहीर  करते रोटरी क्लबने येथे अंत्यविधीपासून पुढच्या १२ ते १३ दिवसांमध्ये केल्या जाणार्या विधीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत आता या सुविधांचा निगराणी ठेऊन त्या सदैव सुस्थितीत राहतील  याची काळजी घेणे ही स्थानिक रहिवाशांसह आपली सर्वांची  जबाबदारी  आहे आम्ही  रोटरी  क्लबचे मनापासून आभारी आहोत

 

Protected Content