आमदार पाटील यांच्या हस्ते पुनर्जिवित पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत

बोदवड, प्रतिनिधी | पुनर्जिवित पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत झाल्याने बोदवड तालुक्यातील १४ व मुक्ताईनगर तालुक्यातील ३ गावांचा पाणीप्रश्न मिटणार आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हिंगणे येथील १० लाख लिटर पाण्याची क्षमता असलेल्या MBR येथून व्हॉल्व ऊघडून महाराष्ट्र जिवन प्राधिकरण अंतर्गत टाकलेल्या नविन पाईपलाईन मधून पाणीपुरवठा करण्यात आला.

 

प्रलंबित पाणीपुरवठा योजनां संदर्भात दि. ११ रोजी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ऊपस्थितीत महाराष्ट्र जिवन प्राधिकरण व पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांच्या पार पडलेल्या बैठकीत पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी २०१८ पासून प्रलंबित असलेल्या योजना तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.  यानंतर, १७ गावांची पुनर्जिवित पाणीपुरवठा योजना कार्यान्वयीत झाल्याने पाणीप्रश्न मिटण्याचे चिन्ह दिसत आहेत. बोदवड शहर स्वतंत्र पाणीपुरवठा योजना व ऊर्वरित गावांच्या योजना लवकरच कार्यान्वयीत होणार आहे. ८० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील बोदवड गटातील ५१ गावांच्या पुनर्जिवित योजने अंतर्गत असलेल्या हिंगणे MBR येथून मुक्ताईनगर येथील ३ व बोदवड तालुक्यातील १४ गावे असे एकूण १७ गावांना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व्हॉल्व ऊघडून मजीप्रा अंतर्गत टाकलेल्या नविन पाईपलाईनमधून पाणीपुरवठा करण्यात आला. हिंगणे MBR ची कँपँसिटी १० लाख लिटर आहे. शिरसाळे , कोल्हाडी , चिंचखेड सिम , एनगाव , वरखेड , घाणखेड , वडजी हरणखेड , चिंचखेड प्रबो ,  हिंगणे , आमदगाव , सोनोटि , जुनोना , निमखेड , सारोळा , माळेगाव , निमखेडी या गावांचा समावेश आहे.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटील,  स्विय सहाय्यक प्रविण चौधरी, तालूकाप्रमूख छोटू भोई, विधानसभा क्षेत्र प्रमूख सुनिल पाटील, युवासेना जिल्हाप्रमूख पंकज राणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा. हितेश पाटील , मुक्ताईनगर नगरपंचायतीचे गटनेते पियूष मोरे, गटनेते निलेश शिरसाठ, गटनेते राजेंद्र हिवराळे,  नगरसेवक आरीफ आझाद , नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक संतोष मराठे, नगरसेवक संतोष कोळी,  नगरसेवक वसंता भलभले, महैंद्र मोंढाळे, योगेश पाटिल, गोकूळ पाटिल, अण्णा पवार, मजीप्रा अभीयंता चव्हाण, ग्रा पा पु ऊपअभीयंता लोखंडे, तायडे यांची ऊपस्थिती होती.

 

Protected Content