राणा दाम्पत्याच्या इमारतीची मनपाकडून पाहणी

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा –   राजद्रोहाच्या गुन्ह्यात कोठडीत असलेले राणा दांपत्याच्या खर येथील निवासस्थानावर अनधिकृत बांधकाम आहे कि नाही हे पाहण्यासाठी मनपा प्रशासनाने नोटीस राणा दाम्पत्याच्या बंगल्यावर लावली आहे. आज मनपा अधिकारी तपासणीसाठी जाणार आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री ‘ निवासस्थानासमोर अमरावतीचे खा. आणि आ. राणा दाम्पत्यावर हनुमान चालीसा पठन करीत दोन गटांमध्ये तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली राजद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. सध्या अटकेत असलेले आ. रवी राणा व खा.नवनीत राणा यांचे मुंबईतील खार पश्चिम १४ वा रस्ता येथील ‘लाव्ही’ इमारतीत  निवास स्थान आहे. या इमारतीच्या  पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने इमारतीवर अनधिकृत बांधकाम असल्याची पालिकेने नोटीस बजावली आहे. या संपूर्ण इमारतीची बुधवारी पाहणी मनपा अधिकारी करणार   असून राणा दाम्पत्याच्या निवासस्थानावर देखील नोटीस लावण्यात आली आहे.

Protected Content