बाळासाहेबांचा जुना व्हिडीओ शेअर करत राज यांचा सूचक इशारा !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार आज राज्यात बर्‍याच ठिकाणी मनसैनिकांनी अजान सुरू असतांना हनुमान चालीसा लावल्याचे दिसून आले असतांनाच राज यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत बुधवारपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या निर्देशानुसार हनुमान चालीसाचे वाचन केले आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी राज ठाकरेंनी ट्विटरवरुन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणाचा एक जुना व्हिडीओ पोस्ट केलाय.

राज ठाकरेंनी पोस्ट केलेल्या व्हिडीओला कोणतीही कॅप्शन दिलेली नाही. या व्हिडीओमध्ये बाळासाहेब ठाकरे हे भाषणादरम्यान, ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल, त्यावेळेला रस्त्यावरील नामाज पठण बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्रविकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कोणाला उपद्रव होत असेल त्याने येऊन मला सांगाव, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. मशिदीवरील लाऊडस्पीकर्स खाली येतील, बंद असं बाळासाहेब या व्हिडीओत म्हणतांना दिसून येत आहेत. या माध्यमातून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचल्याचे दिसून येत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!