रेल्वे क्वाटरच्या मटेरियलची परस्पर विल्हेवाट ; लिलाव रद्द करण्याची रेल्वे प्रशासनावर नामुष्की

 

भुसावळ, प्रतिनिधी । मध्य रेल्वे विभागातील सहाय्यक अभियंता मुख्यालय इंजिनियर विभाग कार्यालय (दुय्यम) मध्ये रेल्वेने क्वाटर ( घर ) तोडण्यासाठी निविदा काढण्यात अली होती. मात्र, जाहीर लिलावाच्या दिवशीच गुरुवार ७ जानेवारीला बोली लावणाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने रेल्वे प्रशासनावर बयाणा रक्कम परत करण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी लिलावात भाग घेणाऱ्यांंनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,रेल्वे प्रशासनाने हद्दीवाली चाळ, लोको परिसर भुसावळ येथील रहिवाशांना क्वाटर खाली करण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्याची माहिती रेल्वे इंजिनियर विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. हद्दीवाली चाळ येथील एकूण ७३ क्वाटर तोडण्यासाठी डिव्हिजन ऑफिस इंजिनियर विभाग भुसावळ यांच्या मार्फत औकॅशन नोटीस नंबर 01/2020-21 दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी काढली असून ज्यांना ठेका मिळाला त्याला तोडलेल्या इमलाचे (RB-1) क्वाटर,खिडकी/दरवाजे घेऊन जाता येतील असे नमूद करण्यात आले होते.

परंतु, रेल्वे अधिकारी व आरपीएफ ह्यांचा संमतीने निविदा निघण्याचा आधीच (RB-1) क्वाटर मध्ये लावण्यात आलेले ६ दरवाजे,२ खिडक्या (सागवान),९ बॉटम शेडसाठी,सिमेंट पत्रे तसेच लोखंडी अँगल, लोखंडी पाईप, लोखंडी आसारी तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी ३ इंची लोखंडी पाईप तर संपूर्ण (RB-1) क्वाटरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन ६ इंची, फॅनसिंगमध्ये लावण्यात आलेला लोखंडी दरवाजा असे एकूण अंदाजे जुने मटेरियल एका क्वाटरला २४ हजार रुपये पर्यतचे लावण्यात आलेले ठेकेदारासोबत संगनमत करून परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप लिलाव बोली लावणाऱ्यांनी केला.

(RB-1) हद्दीवाली चाळ, लोको परिसर भुसावळ येथे एकूण ७३ क्वाटर बनविण्यात आली होती. ही सर्व
क्वाटर रेल्वे प्रशासनाने खाली करून ती तोडण्यासाठी लिलाव बोली दिनांक ७ जानेवारी २०२१ रोजी दुपारी लावण्यासाठी लिलाव बोली लावणाऱ्यांकडून १० हजार ७०० रुपये डिपॉझिट ८७ लोकांकडून स्वीकारले. यानंतर दुपारी ४.३० वाजेच्या दरम्यान ५ लाख ३२ हजार ९७० रुपये किंमतीची क्वाटर तोडून मटेरियल उचण्यासाठी लिलाव बोली सुरू करणार आली. त्यावेळी काही लोकांनी त्या लिलाव बोलीमध्ये आक्षेप घेऊन ती रद्द करण्यासाठी जोरदार आवाज उठविला. त्यांनी रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रश्न विचारून हादरून सोडले. यात त्यांनी आम्हाला क्वाटरच्या लिलाव बोलीमध्ये काय-काय मिळणार त्याचे विवरण सांगा अशी विचारणा केली. यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी मौन व्रत धारण केले.

आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही असे उडवा-उडवीचे उत्तर दिली. जाहिर लिलाव बोली होण्याच्या एक आठवड्या आधी क्वाटर मधील लोखंडी अँगल, लोखंडी पाईप, लोखंडी आसारी ,सागवानी दरवाजे, खिडक्या असे आधीच गायब झाले असून त्या ठिकाणी सिमेंट-रेतीच्या भिंती उभ्या आहेत. त्या घेऊन आम्ही काय करणार ? अशी जोरदार खंडीजंगी चर्चा लिलाव बोली लावणारे व जाहीर लिलावातील रेल्वे प्रशासकीय अधिकारी एडिईएन विशाल भाकुणी, बी. डी. भोळे, मुख्य कार्यलय अधीक्षक संकेत देशमुख, वरिष्ठ अनुभाग अभियंता कार्यालय लोको भुसावळ (आय.ओ.डब्यु) रंगली. रेल्वे विभागाने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप लिलाव बोली लावतांना झाल्याने काही वेळ लिलाव तहकूब करून या अधिकाऱ्यांनी कार्यालयात आपापसात चर्चा केली व हे प्रकरण अंगलट येणार असल्याने जाहीर लिलावात बोली लावणाऱ्यांना त्यांचे पैसे परत देण्यातच आपली समजदारी असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतला.

यावेळी डिपॉझिट दिलेल्या 21 लोकांनी परत घेण्यास नकार देऊन या प्रकरणाची व्हिजिलन्स व सी.आय मार्फत चौकशी करण्याची मागणी अजीज खान शेख खान, इरफान खान अजीज खान ,इम्रान खान अजीज खान ,अरबाज खान अजीज खान ,शेख अकिल शेख नजीर, शेख जहिर शेख नजीर,शेख बब्बू शेख आयज,शाहरुख खान,वसीम खान,तन्वीर खान,इम्रान खान,हाकीब खान,रईस खान,एस.आर.खान, आशिख खान शेख खान,सादिक खान शेख खान,जावेद खान ,जुबेर खान,शहादाब खान,राहील खान,सोहेल खान असे सर्व मिळून करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Protected Content