यावल तालुक्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक

yawal gaun khanij

यावल (प्रतिनिधी)। महसूल व पोलिस यंत्रणेच्या संगनमताने संपूर्ण तालुक्यात व यावल शहरात परिसरात गौण खनिज अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांचा खुलेआम धुमाकूळ घातल्याने नागरीकांमध्ये जिल्हा यंत्रणेच्या कामांबाबत संभ्रम निर्माण होत आहे. यावरून पोलिसांनी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असताना त्यात गौण खनिज वाहतूक करणारे वाहन दिसत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत असून ‘आंधळ दळतंय आणि कुत्र पिठ खातं’ असं बोलले जात आहे.

यावल शहरातून भुसावळकडून कोळन्हावी किनगावमार्गे यावल सातोद वड्रीकडून शेळगाव बॅरेजमार्गे बोरावल यावल, थोरगव्हाण, मनवेल, पथराड, किनगाव इत्यादी परिसरातून वाळू, दगड, गोटे, माती, मुरुम, खडी इत्यादी गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांचा रात्रभर धुमाकूळ सर्रासपणे उघड सुरू आहे. यावल शहरासह तालुक्यात मोठ्या संख्येने सर्व प्रकारची बांधकामे सुरू आहे. रात्रीच्या वेळेस परवानगी नसताना तसेच गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसताना ट्रॅक्टर, डंपर, ट्रक, इत्यादी छोट्या-मोठ्या वाहनातून गौण खनिज वाहतूक होते. कशी हा महत्त्वाचा मुद्दा, प्रश्न उपस्थित होत असला तरी गौण खनिज वाहतुकीत जळगावपासुन तर यावल तालुक्यातील अनेक गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमध्ये सर्वच राजकीय पक्षाशी सलोख्याचे हितसंबंध असणारे 80 टक्के व्यवसायिक आहेत. हे यावल तालुक्यातील महसूल व पोलिस यंत्रणेवर राजकीय प्रभाव दबाव टाकून चिरीमिरी देऊन कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल करून स्वतःची चांदी करून घेत आहे.

काल 15 जून रोजी रात्री 9 वाजता यावल तहसील व पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या एका डंपर चालकात व संबंधितांमध्ये चांगलाच राडा झाला शेवटी ते गौण खनिजाचे डंपर आठवडे बाजारात मोकळ्या जागेवर एकांतात उभे करून नंतर रात्री विल्हेवाट लावण्यात आली अशा काही डंपरच्या मागेपुढे एक फोर व्हीलर संरक्षणासाठी तडजोडीसाठी तैनात राहत असल्याचे प्रत्यक्ष दिसून येते परंतु संबंधितांचा मासिक हप्ता निश्चित सुरू असल्याने त्या अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कधीच कारवाई होत नाही जी काही कारवाई होते त्यात फक्त पाच ते दहा टक्के वाहनधारकांवर कारवाई होते म्हणजे बाकीची 90% गौण खनिज वाहतूक करणारे वाहन सर्रासपणे खुलेआम गौण खनिज वाहतूक करून धावत असतात.

यावल शहरात बोरावल दरवाजा भागात गट नंबर 712 चे खुला भूखंड जागेवर तसेच इतर सर्व ठिकाणच्या विकसित भागात ओपन स्पेस जागांवर गौण खनिजाचे अनधिकृत साठे रात्रीच्या वेळेस करून दिवसा गौण खनिजाची वाटप करण्यात येते या तस्करीत सातोद रोड कडून नवीन रस्त्यावरून विरार नगर भागात तसेच फालक नगर, गंगानगर, तिरुपती नगर, व्यास नगर, कृष्ण तारानगर, पांडुरंग सराफ नगर, गणपती नगर, आयेशा नगर, यांच्यासह ह् इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज वाहतूक होत असते काही ठिकाणी लिलाव नसताना गौण खनिज उपसा होतो कसा याबाबत यावल तहसीलदारांकडे शेकडो अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे नाव पत्ता वाहन क्रमांकाची यादी सादर केली जाणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

Protected Content