जिल्ह्यातील प्रस्तावित सात बलुन बंधारे लवकर पूर्ण होणार – खासदार उन्मेष पाटील

kasoda stkar

चाळीसगाव प्रतिनिधी । प्रस्तावित पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काळात खासदार म्हणून सात बलून बंधारे पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आपण दिलेल्या प्रचंड मतामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. लोकसभा मतदारसंघात विकासाची गंगोत्री उभी करेन राज्यात हा मतदारसंघ आदर्श कसा होईल, यासाठी सर्वांच्या सहकाऱ्यांनी कायापालट करू, अशी ग्वाही नवनिर्वाचित खासदार उन्मेष पाटील यांनी सायगाव ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात दिली. सायगाव येथील श्रीराम मंगल कार्यालयात रात्री 8 वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वेणूताई जगताप तर प्रमुख अतिथी जि.प.शिक्षण सभापती पोपट भोळे, तालुकाध्यक्ष के.बी.दादा साळुंके, पं.स.चे उपसभापती संजय पाटील, उद्योजक मंगेश चव्हाण, माजी पं.स. सदस्य दिनेश बोरसे, संभाजी राजे पाटील बाजार समितीचे संचालक धर्मा काळे, भाजप युवा मोर्चा जिल्हा समन्वयक कपिल पाटील, नगरसेवक भास्कर पाटील, मारुती काळे, अण्णासाहेब पगार प्रभाकर सोनवणे, रोहन सूर्यवंशी सुधीर पाटील, डी.के.माळी, सुभाष सूर्यवंशी, भाजप तालुका विस्तारक गिरीश बऱ्हाटे, पं.स.सदस्य सुनील पाटील, दिनेश महाजन, सुभाष सोनवणे अर्जुन माळी, शंकर माळी, गोकुळ रोकडे, समीर मंसूरी, सुरेश माळी, शेषराव चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच पहिलवान नथू चौधरी यांनी केले.

खासदार उन्मेष पाटील पुढे म्हणाले की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या प्रसंगी सायगाव मांदूर्णे पुलाचे काम केले तरच पुन्हा निवडणुकीसाठी मत मागायला येईल असे वचन दिले होते. साडेपाच कोटी रुपये खर्चाचा सायगाव मांदूर्णे या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे हा पूल नसून दोन्ही गावांच्या मनाना जोडणारा सेतू आहे गेल्या 60 वर्षांपासून या पुलाची मागणी असताना आजवरच्या कुठल्याही राज्यकर्त्याने याबाबत हालचाली केल्या नाही मात्र हे काम दिलेल्या वचनाप्रमाणे पूर्णत्वास नेले आहे बगळा देवी मंदिर परिसरासाठी 80 लाखाचा निधी , 59 लाखाचा बंधारा ,व्यायाम शाळा रस्ते तसेच जलयुक्त शिवार योजनेची मोठ्या प्रमाणात विकास कामे झाल्याने येथील ग्रामस्थांनी मला भरभरून आशीर्वाद दिले आहे येत्या काळात खासदार म्हणून सात बंधारे पूर्ण करण्याचे मी ठरवले असून येत्या काळात बलून बंधारे पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मतदार संघात जलसिंचन क्रांती करावयाची आहे यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मार्गदर्शनाची गरज असून यामुळे शेतकरी राजा अधिकाधिक समृध्द होईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती पोपट भोळे, भाजप तालुकाध्यक्ष के बी दादा साळुंखे समीर मंसुरी, उपसभापती संजय पाटील, पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे , उद्योजक मंगेश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शंकर मोरे यांनी मानले. यावेळी विविध संस्था, मित्र मंडळ, सामाजिक संघटना तसेच वैयक्तिक मान्यवरांनी खासदार उन्मेष पाटील यांचा सत्कार केला.

ट्रीपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी ने गावाचे नाव मोठे केले. मात्र त्याला पोलिस अधिकारी करण्यासाठी उन्मेष पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मागे लागून कायद्यात तरतूद करायला भाग पाडून विजय चौधरी यांना अधिकारी बनविले. माझे समक्ष मुख्यमंत्री महोदयांना आग्रह धरत त्यांनी विजय चौधरी यांना मोठा सन्मान प्राप्त करून दिला. खासदार उन्मेष पाटील यांची धाडसी पाऊल, कर्तव्याप्रती असलेली प्रामाणिक प्रयत्न यामुळे राजकीय पटलावर त्यांचे भविष्य उज्वल असल्याची भावना माजी सरपंच पहिलवान नथु चौधरी यांनी व्यक्त केली.

Protected Content