ब्रेकींग :भरधाव ट्रकने एकाला चिरडले; चालक फरार !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील  एसएसडी ऑटो पार्टस दुकानासमोर एका भरधाव ट्रकने एका ५० वर्षीय प्रौढ व्यक्तीचा चिरडल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अशोक बरखतमल बजाज (वय-५०, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरात अशोक बजाज हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. नेहमीप्रमाणे अशोक बजाज हे मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले. जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील एसएसडी ऑटो पार्टस दुकानासमोरून पायी जात असतांना त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ६८३४) ने धडक देवून त्यांना चिरडले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान अपघात घडल्यानंतर ट्रकचालक हा ट्रक घेवून पसार झाला. भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश कोळी करीत आहे.

Protected Content