Breaking News : पुरी एक्सप्रेसमध्ये २६ किलोचा गांजा पकडला !

रेल्वे सुरक्षा बलच्या डॉग स्कॉडची कारवाई

भुसावळ लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या डॉगस्कॉड पथकाला तपासणी दरम्यान पुरी गांधीधाम एक्सप्रेसमधून सुमारे २ लाख ६२ हजार ५८० रुपये किमतीचा २६ किलो गांजा आढळून आल्याची घटना शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आढळून आलेला मुद्देमाल भुसावळ जीआरपी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.

रेल्वे पोलीस सूत्रांकडून दिलेली माहिती अशी की, शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी रेल्वे क्रमांक २०८०३ पुरी गांधीधाम एक्सप्रेसची तपासणी रेल्वे सुरक्षा बलाचे डॉग पथकातील कॉन्स्टेबल संजय पाटील व जितेंद्र इंगळे करत होते. ही रेल्वे गाडी अकोला ते भुसावळ दरम्यान प्रवास करत असताना आचेगाव स्टेशनजवळ कोच क्रमांक S-९ तपासणी करत असतांना एका वॉशरूम जवळ बोगीतील शौचालयात डॉगला काहीतरी संदिग्ध वस्तू असल्याचा संशय आल्यानंतर त्याने पथकाला सिग्नल दिला. त्यानुसार दोन गोण्या बेवारसरित्या आढळून आल्या. त्याची तपाणी केली असता गांजा असल्याचे निदर्शनास आले.

पथकाने हा मुद्देमाल भुसावळ रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्म क्रमांक ४ येथे रेल्वे पोलीस निरीक्षक आर.के.मिना, उपनिरीक्षक के आर तडवी, अनिल कुमार तिवारी, पोलीस उपनिरीक्षक विनोद खरमाटे, सहाय्यक फौजदार वसंत महाजन, विजय पाटील, योगेश पाटील, जीआरपीचे धनराज लोले यांच्या उपस्थितीत गोण्याखाली उतरवण्यात आल्या. यानंतर नायब तहसीलदार शोभा घुले आणि पंच यांच्या उपस्थितीत गोण्या उघडण्यात आल्या. त्यात तब्बल २ लाख ६२ हजार ५८० रुपये किमतीचे २६ किलो गांजा आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली.

Protected Content