Home Cities अमळनेर पती-पत्नीच्या वाद; पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह सासरे व दीराला केली मारहाण

पती-पत्नीच्या वाद; पत्नीच्या नातेवाईकांनी पतीसह सासरे व दीराला केली मारहाण

0
104

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात पत्नीला मारहाण केल्याच्या कारणावरून पत्नीच्या नातेवाईकांनी येऊन पतीसह सासरे व दीर यांना फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना ६ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी गुरुवार ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मारहाण करणाऱ्या ५ जणांविरोधात मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील कळमसरे गावात गणेश देवाजी भिल वय-३५ हे आपल्या पत्नी रंजना भिल यांचे सोबत वास्तव्याला आहे. दरम्यान ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता गणेश भिल व पत्नी रंजना भिल यांच्या कौटुंबिक वाद झाला. त्यामुळे रंजना बिल यांनी माहेरी काळखेडा ता. धुळे येथे फोन करून माहिती दिली. त्यानुसार रंजना भील यांचे भाऊ राजू धोंडू भिल, गणेश धोंडू भिल, विजय दामू भिल, विकास सुभाष भिल आणि अमोल अरुण निकम या पाच जणांनी कळमसरे येथे येऊन रात्री ११ वाजता गणेश भील यांना मारहाण केली. तसेच गणेशचे वडील देवाजी गोजू भील आणि त्यांचा भाऊ कृष्ण देवाजी भिल यांना देखील ५ जणांनी फायटरने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. दरम्यान याप्रकरणी जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर गुरुवारी ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गणेश भिल यांनी फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणारे शालक राजू धोंडू भिल, गणेश धोंडू भिल दोन्ही रा. काळखेडा ता.जि. धुळे, विजय दामू भिल, विकास सुभाष भिल आणि अमोल अरुण निकम तिघे रा. बहादारपूर ता. अमळनेर या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील तेली हे करीत आहे.


Protected Content

Play sound