BIG NEWS : रामानंदनगर पोलिसांचा दणका; गुन्हेगार “मयूर”वर एमपीडीएची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे (वय-३१) रा.जळगाव याला जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी एमपीडीए कारवाई अंतर्गत कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले आहे.

“मयूर”वर वेगवेगळे स्वरूपाचे ६ गंभीर गुन्हे दाखल
या संदर्भात अधिक माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा गुन्हेगार मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याच्यावर रामानंदनगर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गंभीर स्वरूपाचे ६ गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचा प्रयत्न, दरोड्या प्रयत्न, जीवेठार मारण्याची धमकी, नागरीकांमध्ये दहशत निर्माण करणे, जुगार खेळणे असे वेगवेगळे स्वरूपाचे गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील कोणतीही बदल झालेला दिसला नाही. या अनुषंगाने रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी एमपीडीए करण्याच्या कारवाईसाठी प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविला. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी अहवालाचे अवलोकन करत एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्या मंजूरी दिली आहे.

कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी
दरम्यान रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, सुशील चौधरी, एलसीअीचे पोहेकॉ सुनील दामोदरे, पो.ना. रेवानंद साळुंखे, पो.ना. हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, पो.कॉ. रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, इरफान मलिक, किरण पाटील आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर पाटील यांनी मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे याला अटक करून कोल्हापूर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यासाठी रवाना झाले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या प्रस्तावासाठी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Protected Content