‘मला माहित नाही’ किंवा ‘मला कसे तरी होतेय म्हणत रियाने टाळली बहुतांश प्रश्नांची उत्तरं

मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी ईडीच्या काल तब्बल ८ तास चाललेल्या चौकशीत रिया चक्रवर्तीने बहुतांश प्रश्नांचे उत्तर एकतर ‘मला माहित नाही’ किंवा ‘मला कसे तरी होतेय’, असे दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

रिया चक्रवर्तीची मॅनेजर श्रुती मोदीची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली. श्रुती मोदी सुशांत सिंह राजपूतसाठीही काम करत होती. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिया चक्रवर्ती आणि मोदी यांचे जबाब ईडीने नोंदवून घेतले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने बहुतांश प्रश्नांची उत्तरे मला माहित नाही’ किंवा ‘मला कसे तरी होतेय सांगत देणे टाळले आणि त्यामुळे शुक्रवारची चौकशी ही जास्त काळ चालली. रिया चक्रवर्तीने ईडीसमोर येण्यास आधी नकार दिला होता. तिने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत ईडीकडे वेळ मागितली होती. मात्र ईडीने तिचे वकील सतीश मानेशिंदे यांचे अपील फेटाळत तिला मुंबई स्थित कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, वडील इंद्रजीत चक्रवर्ती आणि सुशांतची बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यांची देखील शुक्रवारी चौकशी झाली. याप्रकरणी रिया, शौविक, इंद्रजीत आणि श्रुती मोदी यांची पुन्हा सोमवारी चौकशी होणार आहे. त्यांना चौकशीसाठी सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Protected Content