रुपा शास्त्री यांचा ‘ नारीरत्न’ने सन्मान‌

 

एरंडोल : प्रतिनिधी  । शास्त्री इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसीच्या सामाजिक कार्याबद्दल व मिसेस इंडिया २०२१स्पर्धेच्या अंतिम  फेरीत निवडीबद्दल राष्ट्रीय नारी सशक्तीकरण संघ (नवी दिल्ली) तर्फे संस्थापक सचिव रुपा शास्त्री यांना नारीरत्न सन्मान देवून गौरविण्यात आले .

 

शास्त्री फाऊंडेशन तर्फे रुपा शास्त्री यानी ग्रामीण भागात महिलांमध्ये सॅनीटरी नॅपकीन वापराबाबत व महिलांच्या आरोग्याबाबत जागृती केली . दरवर्षी त्यांची संस्था एक गाव दत्तक घेऊन तेथील स्त्रियांना सॅनीटरी नॅपकीनचे मोफत वाटप करते . या कामात त्यांचे पती व शास्त्री इन्स्टिट्युटचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभत असते.

 

त्यांचे  फॅशन मॅगझिन ‘मिनी एन मोर ‘ च्या कव्हर पेज स्पर्धेसाठी फायनल लिस्ट आहेत. भारतीय सौंदर्यवती पुरस्कारासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रीत होत्या .ताज इव्हेंटस ब्युटी काँटेस्ट साठी त्यांची ऑडिशन ज्युरी म्हणुन निवड झाली आहे. अनेक सामाजिक कार्यातही रुपा शास्त्री यांचा मोलाचा वाटा असतो . त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

Protected Content