चैतन्य तांडा येथे कारवाईचा बडगा

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । टाळेबंदी उठवताच विना मास्क वावरणारांची संख्या वाढल्याने चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने पुन्हा विना मास्कधारकांवर कारवाईचा बडगा सुरू केला आज  ३२ जणांवर कारवाई करण्यात आली.

 

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहेत. त्यामुळे या लाटे पासून बचाव करण्यासाठी माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी कंबर कसली असून पुन्हा विना मास्कधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू केला आहे. आज  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील विराम लॉन्स समोर ३२ विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. हि कारवाई पोलिसांच्या मदतीने करण्यात आली असून प्रत्येकाला १०० रूपये प्रमाणे दंड ठोठावण्यात आला  यावेळी एकूण ३१५० रूपयांची वसूली करण्यात आली. ही  कारवाई पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पो ना कैलास पाटील, देवीदास पाटील, प्रवीण पाटील, पिराजी देशमुख व इतर होमगार्ड मिळून केली. यावेळी उपसरपंच आनंदा राठोड, संतोष पवार, माजी चेअरमन दिनकर राठोड आदी उपस्थित होते.

 

Protected Content