देशात गेल्या २४ तासांत २२, ७७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांत २२, ७७१ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे.

 

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६४८३१५ वर पोहचला आहे. त्यापैकी २३५४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ३९४२२७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान १८६५५ रुग्ण कोरोना संसर्गामुळे दगावले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४२ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण ९५ लाख ४० हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या.

Protected Content