इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण !

लंडन (वृत्तसंस्था) इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे जगभरात चांगलीच खळबळ माजली आहे.

 

पंतप्रधान जॉनसन यांनी स्वतः याबाबत माहिती देतांना सांगितले की, मागील २४ तासापासून माझ्यात कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. आज चाचणी केल्यावर याची पुष्टी झाली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. पण, व्हिडिओ कॉन्फरंसींगद्वारे काम करतच राहील. ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कालपासून कोरोनाची सौम्य लक्षणं जाणवू लागली होती, अशी माहिती डाऊनिंग स्ट्रिटच्या प्रवक्त्यांनी दिली. गुरुवारी (काल) जॉन्सन यांनी संसदेच्या कनिष्ठ सभागृहात काही प्रश्नांना उत्तरं दिली. यानंतर ब्रिटनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी ख्रिस विट्टी यांनी त्यांना कोरोनाची चाचणी करुन घेण्याचा सल्ला दिला. या तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, जगभरात कोरोनाने १९५ देशांना आपल्या विळख्यात घेतले आहे. आतापर्यंत ५ लाख ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत तर २४ हजार २९४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content