रावेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव; सावद्यात दोन पॉझिटीव्ह रूग्ण

सावदा प्रतिनिधी । आजवर कोरोनाच्या संसर्गापासून दुर असणार्‍या रावेर तालुक्यात अखेर या विषाणूने शिरकाव केला असून सावद्यात दोन पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आल्याने या रूग्णांच्या परिसराला सील करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, पहिल्यांदा सावदा येथे एक पॉझिटीव्ह रूग्ण असल्याची माहिती आली होती. यानंतर आणखी दुसरा रूग्ण आढळून आला आहे. सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असतांना रावेर तालुका, सावदा येथे मात्र अद्याप कोरोना मुक्त होते. परवा आलेले येथील चार रिपार्ट देखील निगेटिव आले असल्याने नागरिकांनी नुकताच सुटकेचा निश्‍वास टाकला होता. मात्र सावदा येथील ६० वर्षीय महिला जळगाव येथे उपचारा साठी भरती असतांना तिचे नुमने तपासणी साठी पाठविले होते त्याचे रिपोर्ट दी १९ रोजी पोजेटिव्ह आल्याने २ जण येथे पोजेटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे, व रावेर तालुक्यात कोरोनाने एंट्री केली आहे

दरम्यान येथे याची माहिती समजताच प्रशासना अलर्ट झाले, नगरपालिकेतर्फे येथे तात्काळ स्वतः मुख्याधिकारी सौरभ जोशी हे कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे सह तर सपोनी राहुल वाघ हे पोलिस कर्मचार्‍यांसह संबंधीत महिला राहत असलेल्या स्टेशन नाका परिसरात दाखल झाले. त्यानी लागलीच हा परिसर सील केला, तर पालिकेचे तर्फे येथे फवारणी करण्यात आली. याच दरम्यान प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले व तहसीलदार उषाराणी देवगुणे हे दाखल झाल्या. त्यांनी सदर भाग पूर्ण सील करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान येथे महिला पोजेटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली असून प्रशासन देखील सज्ज झाले आहे. यावेळी नगराध्यक्ष सौ अनिता येवले, नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, कुशल जावळे, पंकज येवले उपस्थित होते
दरम्यान सदर महिला कोणाचे संपर्कत आली होती ती हिट्री तपासून पाहिली जात आहे, दरम्यान सदर महिलेच्या घरचे तिचे पती, मुलगा तसेच त्यांचे संपर्कत आलेल्या सुमारे ३० जणांना बाबूसेठ यांच्या मंगल कार्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले आहे, तर उद्या सावदा येथे आ चंद्रकांत पाटील हे प्रशासना सोबत एक बैठक घेणार असून पुढील उपाय योजने बाबत माहिती घेणार आहेत.

Protected Content