Home धर्म-समाज संचारबंदी : खिरोदा मंडळात गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

संचारबंदी : खिरोदा मंडळात गरजुंना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप

0
59

सावदा, ता. रावरे प्रतिनिधी । खिरोदा मंडळतील खिरोदा प्र यावल, सावखेडा बुद्रुक, सावखेडा खुर्द कुंभारखेडा, गौरखेडा, जुनी मोहमंडली या गावातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी दिलेले धान्य व रोख स्वरुपातील पैसे यांच्यासह ८० किटचे वाटप करण्यात आले.

आज मंडळातील गरजू लाभार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने ८० किट वाटप करण्यात आले. मंडळ अधिकारी खिरोदा प्र यावल संदीप जयस्वाल, खिरोदा तलाठी प्रमोद नायदे, सावखेडा तलाठी अजय महाजन, चिनवाल तलाठी उमेश बाभूळकर, उतखेडा तलाठी हेमांगी वाघ, लोहारा तलाठी खुरशाद तडवी, कोचूर तलाठी श्रीहरी कांबळे व शांताराम कोतवाल, फिरोज कोतवालयांच्या मदतीने सदर किट वाटप करण्यात आले. या प्रसंगी फैजपूर प्रांत अजित थोरबोले , रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे , गटविकास अधिकारी रावेर, व मंडळतील वरील कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound