भुसावळ, प्रतिनिधी । कोरोना क्वारंटाइन सेंटरमधील संशयित रुग्ण व कोरोना बाधित रुग्णांच्या जवळच संपर्कात व्यक्तींचे तपासणीसाठी लवकरात लवकर स्वॅब घेण्यात यावे अशी मागणी भाजपा नगरसेविका मेघा देवेंद्र वाणी यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जळगाव जिह्यात कोरोनाच्या आढावा बैठकीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे हे बुधवारी जळगाव दौऱ्यावर आले होते. भुसावळमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर भुसावळलाही कोरोनाची आढावा बैठक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली.यानंतर नागसेविका मेघा वाणी यांनी आरोग्य मंत्री यांना निवेदन दिले. या निवेदनात भुसावळ शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना व जवळच्या लोकांना क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन केली जाते. परंतु पाच-सहा दिवसांनंतरही त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले जात नाहीत. व स्वॅब घेतल्यानंतरही चार-पाच दिवसातपर्यंतही त्याचा रिपोर्ट येत नाही. त्यामुळे त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दहा ते बारा दिवस राहावे लागत आहे. तेथे भरपूर संशयित रुग्ण असल्याकारणाने त्यांना तेथेही संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो आणि त्यांना व त्यांच्या परीवाराला मानसिक त्रास सहन करावा लागतो. याकडे संबंधित यंत्रणेस लवकरात लवकर स्वॅब तपासासाठी नेण्याचे व लवकर रिपोर्ट देण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती नगरसेविका मेघा वाणी यांनी केली आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत अखिल भारतीय लेवा पाटीदार महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र सिताराम वाणी हे देखील उपस्थित होते.