Home धर्म-समाज भामलवाडी कोचुरला अवकाळी पावसाने भिंत कोसळली

भामलवाडी कोचुरला अवकाळी पावसाने भिंत कोसळली

0
60


 

रावेर, प्रतिनिधी । तालुक्यातील भामलवाडी व कोचुर बु येथे अवकाळी पावसाने भिंत पडली असून तालुक्यात कुठेही नुकसान झाले नाही सुमारे ४० मिमी अवकाळी पाऊस झाल्याचे निवासी नायब तहसिलदार संजय तायडे यांनी सांगितले.

निसर्ग वादळाचा फारसा प्रभाव रावेर तालुक्यात जाणवला नाही. कालपासुन रावेर परीसरात अवकाळी पावसाची रीमझिम सुरु आहे.तर भामलवाडी व कोचुर येथे घराची भिंत कोसळली आहे. तसेच शेतीचे कोणतेही नुकसान नसुन तालुक्यात सुमारे ४० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आता रावेर परिसरात जोराने वारे वाहत आहेत.


Protected Content

Play sound