राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा – न्यायाधीश चामले

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । न्यायापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी न्याय विधी सेवा प्रधिकरण कार्यरत आहे. १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा असे आवाहन न्यायाधिश चामले यांनी केले आहे. राष्ट्रीय लोक अदालती बाबत शहरातून रॅली काढण्यात आली. त्यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते.

 

राष्ट्रीय विधी सेवा दिन निमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई जिल्हा विधी सेवा समिती जामनेर व तालुका वकिल संघ जामनेर यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत निमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. जामनेर न्यायालय ते गांधी चौक पर्यंत रॅलीचे आयोजन केले गेले. याप्रसंगी न्यायाधीश बी, एम, काळे, न्यायाधीश पी.व्ही. सूर्यवंशी, सरकारी वकिल अनिल सारस्वत, सरकारी वकील किर्तीका भट, पोलिस निरिक्षक किरण शिंदे, न्यायालयीन कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी हजर होते. जामनेर नगरपालिका चौक परिसरात छोटेखानी सभा घेऊन लोक न्यायालयाचे फायदे बाबत न्यायाधीश चामले यांनी सविस्तर मनोगत व्यक्त केले. रॅली यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

Protected Content