जळगाव, प्रतिनिधी | येथील वाॅरिवर्स शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी औरंगाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय कराटे स्पर्धेत ४ खेळाडूंनी सुर्वण तर दोघा खेळाडूंनी रौप्य पदक पटकविले आहे.
औरंगाबाद येथे रविवार दि. १२ डिसेंबर रोजी मराठा मंदिर सिडको येथे अखिल भारतीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशातील विविध राज्यातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जळगावच्या वाॅरिवर्स शोतोकान कराटे असोसिएशनच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत असोसिएशनची अवनी सोनवणे (नऊ वर्ष), मृण्मय पाटील (वय १० वर्ष), दिव्या बारी (१२ वर्षे ) व गोविंद खजुरे ( वय १९ वर्ष ) या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकविले. तर यथार्थ भोकरीकर (वय ९ वर्ष), सोहम नेहते (वय ९ वर्ष) यांनी रौप्य पदक पटकावले. त्यांना आमदार डॉ. अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले. या सर्व गुणवंतांना संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले. असोसिएशनचे पदाधिकारी पूजा सोनवणे, दिनेश थोरात, अरविंद जाधव यांनी सर्व यशस्वी त्यांचे कौतुक केले.