जळगावात आयएमएतर्फे निदर्शने ( व्हिडीओ )

ima protest jalgaon

जळगाव प्रतिनिधी । कोलकाता येथील डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सदस्यांनी आज निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

कोलकाता येथील एनआरएस मेडिकल कॉलेजचे इंटर्न डॉक्टर परिबहा मुखोपाध्याय आणि डॉ. यश टेकवानी या दोन डॉक्टर्सला रूग्णाच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्यामुळे देशभरातील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) जळगाव शाखेतर्फे आज जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे असणारे निवेदन देण्यात आले. यात भविष्यात या प्रकारच्या घटना न व्हाव्यात यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी असणार्‍यांवर कठोर कार्यवाही करावी, अन्यथा उपोषणासह हे आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारादेखील या निवेदनात देण्यात आला आहे.

याप्रसंगी आयएमएचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप जोशी, सचिव डॉक्टर धर्मेंद्र पाटील, कोषाध्यक्ष डॉक्टर तुषार बेंडाळे, उपाध्यक्ष डॉक्टर दीपक पाटील, जॉईंट सेक्रेटरी डॉक्टर डॉ. राधेश्याम चौधरी, डॉ. अनिल पाटील, डॉ. स्नेहल फेगडे, डॉक्टर जितेंद्र कोल्हे, डॉक्टर तिलोत्तमा गाजरे, डॉ. मनीषा दमानी, डॉ. विकास बोरोले, डॉ. सुशील राणे, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. भारत बोरोले, डॉ. पंकज शाह, डॉ. दिलीप महाजन, डॉ. किरण मुठे, डॉ. विलास भोळे, डॉ. राजेश पाटील आदींसह अन्य सदस्यांची उपस्थिती होती.

पहा : आयएमए पदाधिकार्‍यांची निदर्शने व प्रतिक्रिया.

Protected Content