सीबीएसई इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केली चिमुकले राममंदीरात स्वच्छता

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव या शाळेत मा. पंतप्रधान भारत सरकार यांच्या वतीने एक तारीख एक घंटा एक साथ स्वच्छता अभियानासाठी श्रमदान हा कार्यक्रम श्री चिमुकले राम मंदिर या ठिकाणी पार झाला.

हा कार्यक्रम पूर्ण भारतभर साजरा केला जात असून महाराष्ट्रातून फक्त साठ शाळेची निवड केंद्रीय माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्याद्वारे करण्यात आली होती. त्यातल्या त्यात जळगाव जिल्ह्यातून फक्त आपल्याच शाळेचे निवड झालेली होती. सदर कार्यक्रमात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष डी. टी. पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यासोबतच शाळेच्या प्राचार्य सुषमा कंची, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालकवर्ग यांनी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सकाळी ठीक १० वाजता सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. इ. १० वी चे विद्यार्थी,  आणि शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी एक तारीख एक घंटा एक साथ के लिए श्रमदान या कार्यक्रमात सहभागी होऊन मंदिर परिसराची साफ-सफाई केली.

संस्थेचे कोषाध्यक्ष  डी टी पाटील यांनी भारत सरकारच्या या उपक्रमाला आभार व्यक्त करत संबोधित केले की सदर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांत जनजागृती निर्माण होते. तसेच आपल्या सभोवतालच्या परिसरात आपण नेहमी अस्वच्छता बघतो अशा कार्यक्रमातून स्वच्छता कशी जोपासली जाणार आहे हे विद्यार्थ्यांना कळते आणि त्या दिशेने ते पाऊल उचलतात. शाळेच्या प्राचार्य सुषमा कंची यांनी स्वच्छतेचे महत्व आणि त्यामुळे होणारा सामाजिक बदल याबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक व  शिक्षकेतर यांना संबंधित केले. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत  नंदकुमार बेंडाळे यांनी या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले.

Protected Content