बेंडाळे महाविद्यालयात विद्यार्थींनी घेतला “एच टू ओ” आणि “लाडकी” चित्रपटाचा आनंद

Crime newss1

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘पाणी वाचवा’ आणि ‘बेटी बचाव बेटी पढाव’ हा संदेश देणारे “एच टू ओ” आणि “लाडकी” हे दोन्ही मिलिंद पाटील दिगदर्शीत सिनेमे दाखविण्यात आले.

लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सवाच्या सांगतेनिमित्त चारदिवसीय फकीरा टुरिंग टोकीज महोत्सवाचा समारोप मंगळवारी झाला. यावेळी संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे यांच्यासह कलाकार राज गुंगे, अरुण सानप, रवी परदेशी, रुपेश जैस्वाल, अक्षय नेहे, आकाश पाटील उपस्थित होते. महोत्सवाविषयीचा आढावा मास मीडिया विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे यांनी घेतला. प्रसंगी प्रा.रत्नप्रभा महाजन, प्रा.सुनीता पाटील, नंदिनीबाई शाळेच्या मुख्याध्यापिका सी.एस.पाटील, शा.ल.खडके शाळेच्या मुख्याध्यापिका अंजना सुरवाडे यांचा कर्तृत्ववान महिला म्हणून मान्यवरांनी सत्कार केला.

एच-टू-ओ आणि लाडकी या सिनेमांचे चित्रीकरण जळगाव जिल्ह्यात झाले आहे. वेळीच महत्व ओळखले नाही तर पाण्याच्या भीषण टंचाईला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे असा संदेश देणाऱ्या तरुणांची कथा एच टू ओ मध्ये असून पाण्यासाठीची भटकंती, त्याभोवती फिरणारे राजकारण, समाजकारण पाहून उपस्थितांनी पाणी वाचविण्यासाठी सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे हा बोध घेतला.

मुलींना जन्माला येऊ द्यायचे, त्यांना खूप शिक्षण द्यायचे, मुलगा-मुलगी भेदभाव करू नये असा संदेश लाडकी सिनेमा देऊन गेला. बेकायदा गर्भपात कसा होतो, तो होऊ नये म्हणून प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे हेदेखील कलाकारांनी व्यवस्थित मांडले. आवडत्या क्षेत्रात जाण्याची संधी मिळाली तर मुली कर्तृत्व सिद्ध करून दाखवितात हे दिगदर्शकाने व्यवस्थित मांडले आहे.

प्राचार्य डॉ.एस.एस.राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवासाठी मास मीडिया विभागाचे शिक्षक संतोष सोनवणे, प्रा.जे.डी.लेकुरवाळे यांचेसह विद्यार्थी दीक्षिता देशमुख, सुचित्रा लोंढे, पार्थ ठाकर, प्रा. राविकुमार परदेशी, रसिका नेवे, नेहा बुरसाळे, योगेश्वर चौधरी, कविता चौधरी यांसह फोटोग्राफी व व्हिडिओ ग्राफिक फिल्म मेकिंगचे विध्यार्थी यांचे सहकार्य लाभले.

आज भालचंद्र नेमाडे यांचे व्याख्यान
बुधवारी संस्थेच्या शताब्दी महोत्सवाच्या संगतेनिमित्त ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पदमश्री तथा जेष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांचे डॉ.बेंडाळे महाविद्यालयात सायंकाळी 5 वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. एन.के.ठाकरे राहतील. उपस्थितीचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content