लग्न लावून फसवणूक करणार्‍या टोळीला अटक

जळगाव प्रतिनिधी । लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीला शहरातील कांचन नगरातून दोन जणांना जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गोकुळ रविंद्र सोनार (वय-३०) आणि सोनाली गोकूळ सोनार (वय-२८) दोन्ही रा. साकेगाव ता. भुसावळ असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील शिंदी येथील २८ वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाला होता. मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकूळ रविंद्र सोनार दो.  रा. साकेगाव ता. भुसावळ, आशा नानासाहेब निकम रा. नाशिक, अशोक वीरसिंग खाडे रा. मालदा ता. शहादा जि.नंदुरबार आणि गुड्डीबाई समाधान शिंपी रा. गाळण ता. पाचोरा यांनी भेट घेवून तरूणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि ३० ऑगस्ट २०२१ रोजी नशिराबाद येथील एका तरूणीशी लग्न लावून दिले. दरम्यान, तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर ही भुसावळ येथे जावून येते असे सांगून सोबत दागिने घेवून भूसावळ येथून पसार झाली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. नवरीसह सहा जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी हे जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली, त्यानुसार बुधवारी ८ डिसेबर रोजी दुपारी पथकातील पोउनि अमोल देवढे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, विनोद पाटील, रणजित जाधव, किशोर राठोड, इश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी गोकुळे रविंद्र सोनार (वय-३०) याला तालुक्यातील इदगाव येथून तर सोनाली गोकूळ सोनार (वय-२८) हिला कांचन नगरातून अटक केली आहे. दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content