यावल येथे बेकायदा प्लाट विक्री करणाऱ्या दोघांना प्रांताधिकाऱ्यांनी दिली नोटीस

 

यावल, प्रतिनिधी | तालुका, शहर आणि परिसरातील मोठया गावांमध्ये नागरी सुविधा नसतांना आतिशय महागडया भावात दलालांच्या मध्यस्थीने प्लॉट विक्रीचा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासुन बिनधास्तपणे सुरु आहे. या धंद्यात आपल्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची आर्थिक व्यवहार करून फसवणुक करण्यात येत आहे. या प्रकारची गम्हीर दाखल घेवून विभागाचे प्रांताधिकारी डॉ. थोरबोले यांनी दोघा जणांना नोटीस पाठवून कारवाई संकेत दिले आहेत.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चितोडा येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते निवृती गोविंदा धांडे यांनी दि. ६/११/२०१८ व दि. २३/ ७/२०१९ रोजी फैजपुर येथील विभागीय प्रांत आधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या कार्यालयात चितोडा (ता. यावल) येथील रहिवासी असलेले शंकर उखा पाटील व भागवत रामकृष्ण पाटील या दोघांनी आपल्या मालकीचे शेत जमिन गट नं. ५८/२ मधील क्षेत्र हे १.५१ आर हे क्षेत्रफळ रहिवासी प्रयोजनार्थ बिनशेती केलेले आहे. सदर बिनशेती प्लॉटमध्ये कुठलीही नागरी सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने येथील तहसीलदारामार्फत या प्रकरणी चौकशी करण्यात आलेली असुन त्यांनी अहवाल सादर केलेला आहे.

या जागेत कुठल्याही नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने जमीन मालकांनी शासनाच्या अटीशर्तींचा भंग करून हे प्लॉट विक्री केले आहेत. असे निदर्शनास आले आहे. तरीही काही प्लॉट धारकांनी येथे बांधकाम केले आहे. त्यामुळे जोपर्यंत येथे नागरी सुविधा उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत कुणीही खरेदी-विक्री व्यवहार करू नये, तसेच प्लॉट खरेदी करणाऱ्यांनी मालकी हक्काचा शेरा घ्यावा, असे आदेश डॉ. थोरबोले यांनी दिले आहेत.

यावल शहरातील विस्तारीत क्षेत्रात व तालुक्यातील काही भागात अशा प्रकारे अनेक ठिकाणी शासनाचे अटीशर्ती व नियमांचे उल्लघन करून दलालांच्या माध्यमातुन लाखो रुपयांच्या प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे शासनाच्या तिजोरीत जाणारा महसुल बुडत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येवून नागरिकांची व शासनाची फसगत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

Protected Content