शेतात शेतमजूर महीलेवर चाकूहल्ला

यावल : प्रतिनिधि । तालुक्यातील आडगाव शिवारातील शेतात कामाला गेलेल्या किनगाव येथील महीलेवर एकाने पोटावर व मानेवर  चाकुने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली या महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे .

किनगाव येथील राहणारी महीला ही शेतमजुरीला जात असते आज ही २८ वर्षीय महीला आडगाव शिवारातील विनय साहेबराव पाटील यांच्या शेतात कामास गेली होती याच गावातील राहणारा चंद्रकांत वसंत खलसे या ४५ वर्षीय अविवाहीत ईसमाशी शेतात वाद झाल्याने खलसे यांनी चाकुने मानेवर व डाव्या हातावर वार करून महीलेचे डोके दगडाने फोडल्याची घटना घडली .

शेतमालक विनय पाटील यांनी यावल पोलीसात तक्रार दाखल केल्याचे सांगण्यात आले मात्र रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले . महीलेवर हल्ला करणारा फरार झाला असुन ,त्या महीलेला किनगावला प्राथमिक उपचार केल्यावर पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले आहे .

Protected Content