चाकूचा धाक दाखवत शेतकऱ्याच्या बकऱ्या लांबविल्या; भडगाव पोलीसात गुन्हा दाखल

भडगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील वलवाडी येथे शिवारात वनविभागाच्या जागेवर राहत असलेल्या मजुराला चाकूचा धाक दाखवत ८ बकऱ्या व ४ बकरीचे पिल्ले जबरी हिसकावून चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, बापू खंडू पाटील (वय-६५)  रा. वलवाडी ता. भडगाव जि. जळगाव हे वलवाडी शिवारात वास्तव्याला आहे. शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे बकर्‍या व बकऱ्यांचे पिल्ले असून ते जोडधंदा करतात. दरम्यान गुरुवार २४ मार्च रोजी सकाळी ११.३० ते १२.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात तीन जणांनी येऊन त्यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडून २८ हजार रुपये किमतीच्या ४ बकऱ्या व ४ पिल्ले जबरी चोरून नेले आहे. याप्रकरणी बापू पाटील यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात तीन जणांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!