हिवरखेडा शिवारातून एकाची दुचाकी लांबविली; जामनेर पोलीसात गुन्हा दाखल

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील मोकळ्या जागेवर पार्किंगला लावलेली ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भिकन काशिनाथ सूर्यवंशी (वय-५१) रा. अष्टविनायक पार्क, जळगाव यांचे हे कामानिमित्त त्यांच्या मोटारसायकलने जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथे  २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास गेले होते. त्यावेळी त्यांनी हिवरखेडा रोडवर असलेल्या मोकळ्या जागेवर त्यांची मोटारसायकल पार्किंग करून लावली होती. काम आटोपून ८.३० वाजता परत आल्यानंतर त्यांना मोटारसायकलजागेवर आढळून आली नाही. त्यांनी मोटारसायकलचा परिसरात शोधाशोध केली परंतु मोटारसायकल कोठेही आढळून आले नाही. त्यामुळे त्यांनी जामनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन रितसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रियाज गयास शेख करीत आहेत.

 

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!