जळगाव : प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नुकत्याच दूरदृष्यं प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी जिल्यातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या व्यथा मांडत उपायांना वेग देण्याची मागणी केली
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार उपाययोजना करत आहे. शासनाच्या प्राथमिकतेवर सध्या केवळ जनतेचं आरोग्यच आहे. जे शक्य होईल ते प्रयत्न राज्य सरकारतर्फे केले जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , आरोग्यमंत्री .राजेश टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आढावा बैठक दूरदृष्यं प्रणालीने पार पडली.
जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील यांनी जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाच्या समस्येवर मत व्यक्त केलं. जिल्हाभरात कोरोना रुग्णांसाठी विविध दवाखान्यांमध्ये केली जाणारी चाचणी महागडी असून ती सामान्य जनतेला परवडणारी असावी म्हणून राज्य सरकारतर्फे दर कमी होऊन माफक दरात मिळावी अशी मागणी त्यांनी केली.
खासगी दवाखान्यामध्ये प्रशासनातर्फे शासकीय ऑडीटर अधिकारी नेमलेला आहे त्याठिकाणी स्वतंत्र बैठक कक्ष नेमून वाढीव बिलासंबंधी व इतर आरोग्य सोयींविषयी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल. अशी व्यवस्था करा असेही ते म्हणाले
सध्या ऑक्सिजन व रेमडेसेवीरचा तुटवडा आहे तो दूर होऊन जिल्ह्यातील रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होईल. जिल्ह्यात रेमडेसेवीर व Tocilizumab इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करून रास्त दरात सहज ते रुग्णांना मिळावेत अशी मागणी रविंद्र पाटील केली…राष्ट्रवादी युवकच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून जिल्हाभरातील सहभागी रक्तदाते व आयोजकांचे मंत्री महोदयांनी कौतुक केले….
या बैठकीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रवीकांत वर्पे, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण , विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व इतर प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते…..