शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार जबाबदार : आशिष शेलार

मुंबई (वृत्तसंस्था) बेळगावच्या मतगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार सतिश जारकीहोळी यांचा दबाव कारणीभूत असल्याचा दावा, भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

 

आशिष शेलार यांनी म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कर्नाटकातील मनगुत्ती येथे रातोरात हटवल्याच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेधच करतो. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा हटवण्यासाठी स्थानिक काँग्रेस आमदार सतिश जारकीहोळी यांचा दबाव कारणीभूत केला. त्यामुळे आता शिवसेना कर्नाटकात जाऊन काँग्रेसच्या स्थानिक आमदाराविरोधात आंदोलन करणार का?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगावातून रात्रीच्या अंधारात पोलिसांनी ज्या पद्धतीने हटवला, त्याचा धिक्कार करावा तेवढा कमी. त्याविषयी विरोधीपक्ष बोलायला तयार नाही. चार दिवसांपूर्वी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला होता. त्यांचंच सरकार असलेल्या कर्नाटकमध्ये रात्रीच्या वेळी, दिवे बंद करुन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला जातो, हे कसले लक्षण?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

Protected Content