नगरसेवकांच्या अपात्रतेबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार…!

सावदा (प्रतिनिधी)। येथील विद्यमान नगरसेवक व सत्ताधारी गटाचे गटनेते अजय भारंबे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी याचे न्यायालयात महाराष्ट्र नगरपरिषद नागरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५चे कलम १६ व ४४ प्रमाणे दि ५ रोजी नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचेसह राजेश वानखेडे, फिरोजखान पठाण, सिद्धार्थ बडगे यांनी तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे .

या तक्रारीमध्ये म्हटले आहे की; अजय भारंबे हे नगरसेवक असून हिंदू एकत्रित कुटूंबानुसार पालिकेत भु-अभिन्यास मंजूर केला आहे . तीन महिन्या पूर्वी सत्ताधारी भाजप गटनेते अजय भारंबे यांनी अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे पदाचा दुरुपयोग केला या कारणाने नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे . जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात भारंबे व चौधरी दोन्ही नगरसेवक एकमेकांच्या रडार वर आहेत .पदाचा गैरवापर केल्याने दोघांनी एकमेकांचे पद रद्द करण्याची तक्रार जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे..भू – अभिन्यास मंजूर करताना त्यांनी नगरपरिषदेला १०० रूपयांचे स्टॅमपेपर वर लेखी लिहुन दिलेले आहे कि सदरच्या भु – अभिन्यासामध्ये मी गटारी चे बांधकाम करून देईल स्टॅमपेपरसाठी माझे वारसदार जबाबदार राहतील .असे लिहून दिलेले आहे .सदरील भु – अभिन्यासावर १० लाखाच्या वर वसुली रक्कम असून संबंधित मालकाने नगरपरिषद कडे जमा करावी म्हणून न पा मुख्याधिकारी यांनी संबंधितांना नोटीस बजावलया आहेत . त्यानुसार भु – अभिन्यास मालकाचा मुलगा अजय भागवत भारंबे नगरसेवक आहे . तो सत्ताधारी गटाचा असल्याने आजपावेतो नगरपालिकेची थकबाकी भरण्यास तयार नाही . त्यामुळे या जमिनीवर न पा चे नाव लावण्याचा आदेश मुख्याधिकारी यांनी कर – अधिक्षकांना दिलेला आहे . त्यामुळे यावरून सिद्ध होते की , अजय भारंबे यांनी पदाचा दुरूपयोग केलेला आहे.

अजय भारंबे हे नगरसेवक आहेत व वडील भागवत अवसु भारंबे यांनी एकत्रित कुटुंब पध्दतीने एकत्र अलेली सावदा शिवारातील जमीन गट नंबर १३१ / पार्ट हे नोव्हेंबर २०१९ पासून न पा हद्दवाढीत समाविष्ट झालेली आहे . सदरील जमिनीवर भु -अभिन्यास मंजूर करते वेळी ओपन स्पेस मोकळी जागा व रस्ते दाखविण्यात आले आहे . परंतू या ओपन स्पेस जमिनीवर शेतीची पेरणी करून उत्पन्न घेण्यात येत आहे . त्यामुळे पीता पुत्रांनी संगनमत करून ओपन स्पेस व रस्ताची जागा हडप केल्याचा आरोप केला आहे. नगरसेवक भारंबे यांनी पदाचा गैरवापर करून जागा हडप केल्यामुळे त्यांनी पदाचा दुरूपयोग केलेला असल्याने त्यांना अपात्र करण्याची लेखी तक्रार केली आहे . शहरातील पालिका निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी असून या एकमेकां विरुद्ध असलेल्या त्यांच्या या तक्रारीचा काय निकाल लागतो याबाबत शहरातील नागरिक चर्चा करीत आहे.

Protected Content