मुख्यमंत्री ठाकरे कोकण दौर्‍यावर रवाना

मुंबई प्रतिनिधी । वादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज एक दिवसाच्या कोकण दौर्‍यावर रवाना झाले असून यात ते नुकसान भरपाईबाबत घोषणा करू शकतात.

नुकत्याच येऊन गेलेल्या वादळात कोकणात मोठे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज सकाळी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमधील नुकसानीची पाहणी करणार असून त्यांच्या उपस्थितीत आढावा बैठकींचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे.

दरम्यान, राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारपासून कोकण दौरा सुरू केला असून आज त्यांच्या दौर्‍याची सांगता होत आहे. या दौर्‍यात फडणवीस यांनी सातत्याने सरकारला टार्गेट केले आहे. यानंतर मुख्यमंत्री पाहणी करण्यासाठी कोकणात गेल्याचे मानले जात आहे.

Protected Content