अवैध वाळू वाहतुकदाराचा तहसील आवारातच आत्महत्येचा प्रयत्न !

भडगाव प्रतिनिधी । महसूलचे कर्मचारी इतर वाळूवाल्यांचे ट्रॅक्टर सोडत असले तरी आपले सोडत नाही असा आरोप करून एका अवैध वाळू वाहतुकदाराने तहसील कार्यालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस स्थानकात एनसी दाखल करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, अवैध वाळु वाहतुकीचे ट्रॅक्टर तहसीलच्या ताब्यात असताना रात्रीच्या अंधारात महसुलचे कर्मचारी ट्रक्टर परस्पर सोडतात मात्र माझे ट्रॅक्टर सोडले जात नाही. असा आरोप करत तहसील कार्यालयाच्या मुख्य दरवाज्यावर तरुणाने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत शहरात वाळुमाफीयात एकच खळबळ उडाली असुन या आत्महत्या दबावतंत्राची वाळुमाफीयात व सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगत आहे.

तालुक्यातील वाक येथिल संजय त्रिभुवन या तरुण १९ मे राजी रात्री ७ वाजेच्या सुमारास तहसीलदार सागर ढवळे यांच्या कार्यालयात घुसुन इतराचे अवैध वाहतुकीचे ट्रॅक्टर सोडले जातात मात्र माझे तहसीलच्या ताब्यात असलेले ट्रक्टर मात्र सोडले जात नाही. असा आरडाओरडा करत प्रशासनावर दबाव टाकत माझे ट्रॅक्टर सोडा नाही तर मी आत्महत्या करतो असे सांगुन मुख्य गेटवर मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी तहसीलच्या आवारात हजर असलेल्या काही जणानी त्याला खाली उतरवत त्या तरुणाची समजुत काढुन रवानगी केली. या बाबत वडजी येथिल तलाठी शिंदे यांनी संजय त्रिभुवन विरोधात अर्ज दिल्याने पोस्टेला एनसी नोंदविण्यात आली आहे.

या संदर्भात भडगावचे तहसीलदार सागर ढवळे म्हणाले की, संजय त्रिभुवन या तरुणाने अवैध वाळुचे ट्रॅक्टर सोडण्यासाठी दबावतंत्र चा वापर केला. त्याचे वाहन हे न्यायालयीन प्रक्रीयेत आहे. त्यामुळे ट्रक्टर सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. कोरोनाचा वाढता प्रभाव मुळे अवैध वाळु वाहतुकीकडे दुर्लक्ष झाले होते. यापुढे अवैध वाळु वाहतुकदार विरुध्द दंडात्मक व गुन्हा दाखलची कारवाई करण्यात येणार आहे.

Protected Content