यावल येथे लहान मुलांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी; पाच जण जखमी (व्हिडीओ)

यावल प्रतिनिधी । शहरातील बाबुजीपुरा परिसरात लहान मुलांच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी यावल पोलीसात परस्परविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

सविस्तर माहिती अशी की,  यावल नगरातील बाबुजीपुरा भागात राहणारे कलीम खान जब्बीउल्ला खान, रईस खान जब्बीउल्ला खान, नईम खान जब्बीउल्ला खान तर समोरील शेख सलीम शेख अजीज उर्फ बाबा यांच्यात घरासमोर लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून गेल्या ३ ते ४ दिवसांपासून शाब्दीक वाद सुरू होतो. याचे पर्यावसन आज वाद विकोपाला गेल्याने दोन गट एकमेंकांना भिडले. दोन्ही गटांमध्ये बेदम मारहाण झाल्याची घटना आज २५ मे रोजी सकाळी ११ वाजता घडली. यात चार जण गंभीर जखमी झाले आहे. चौघांना यावल ग्रामीण रूग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम किडके, परिचारीका नेपाली भोळे यांनी उपचार सुरू केले आहे. याप्रकरणी परस्पविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Protected Content