रावेर येथे पोलिसांची वैद्यकीय तपासणी

 

रावेर, प्रतिनिधी । येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच रावेर येथे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली.

रावेर पोलिस स्टेशन येथे सर्व अधिकारी व संपूर्ण पोलीस कर्मचारी तसेच रावेर येथे बंदोबस्त करीता असलेले असे एकूण ७० ते ७५ पोलिसांची सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी रावेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ नीलकंठ महाजन तसेच रावेर येथील डॉ. योगेश पाटील ,डॉ. दत्तप्रसाद दलाल, डॉ. अमिता महाजन यांनी हार्टरेट ,रक्तातील ऑक्सिजन, बीपी, चेस्ट, टेम्प्रेचर इन्फ्रारेड थर्मामिटरने अशा तपासण्या करण्यात आल्या. वावेळी सर्व डॉक्टरांना प्रशंसा प्रमाणपत्र डीवायएसपी यांच्याहस्ते देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरीक्षक यांनी आवाहन केले आहे ,सध्या कोरोना व्हायरस खूप मोठ्या प्रमाणात पसरत असल्याने जनतेने सोशल डिस्टन्स ठेवावे. लॉक डाऊनचे पालन करावे. विनाकारण घराबाहेर निघू नये. मास्कचा सतत वापर करावा. स्वतः होऊन डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घ्यावी. सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. जे ठरवून दिलेले नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी दिला.

Protected Content