देशाच्या कानाकोपऱ्यात कोरोना लस पोहचवण्याची तयारी

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । देशात कोरोनाची लस प्रत्येक भारतीयाला देता यावी यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. लशीचा साठा, त्यासाठी आवश्यक ती कोल्ड चेनसह सर्व प्रकारच्या छोट्या-मोठ्या गोष्टींवर थेट पंतप्रधान कार्यालयाची नजर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात तयार होत असलेल्या ३ प्रमुख लशीच्या विकासाची पाहणी केली. या दरम्यान लशीची ने-आण करण्यासाठी लग्झमबर्गच्या एका कंपनीशी करार करण्याचा सरकारचा विचार आहे. कंपनी आपल्या विशेषज्ञांचे एक पथकही भारतात पाठवत आहे

लग्झमबर्गच्या पंतप्रधानांनी लशीच्या वाहतुकीसाठी प्लांट उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार करत आहेत. लग्झमबर्गचे पंतप्रधान बेटल यांनी १९ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत लग्झमबर्गच्या द्विपक्षीय शिखर संमेलनादरम्यान हा प्रस्ताव दिला. या दिशेने चांगल्या प्रगतीचे देखील संकेत मिळत आहे.

गुजरातमध्ये रेफ्रिझरेटेड व्हॅक्सीन ट्रान्स्पोर्टेशन प्लांट लावण्यात येणार आहे. यामुळे देशातील कानाकोपऱ्यात, गावागावांपर्यंत लस पोहोचण्यास मदत मिळणार आहे.

लग्झमबर्गची कंपनी बी. मेडिकल सिस्टम पुढील आठवड्यात एक उच्च स्तरीय पथक गुजरातला पाठवणार आहे हे पथक तेथे व्हॅक्सीन कोल्ड चेन निर्माण करेल. यात सौर ऊर्जेने चालणाऱ्या रेफ्रिझरेटर, फ्रीझर आणि वे बॉक्सचा देखील समावेश असणार आहे. यात ठेवूनच लस ठिकठिकाणी पाठवण्यात येईल. तसे पाहता प्लांट पूर्णपणे तयार होण्यासाठी सुमारे २ वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र, आता लग्झमबर्गहून रेफ्रिझरेटर बॉक्स मागवून तत्काळ काम सुरू करावे, असा निर्णय कंपनीने घेतला आहे.

 

Protected Content