महाराष्ट्रात मरकजसारखा कार्यक्रम नको- शरद पवार

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी सोशल डिस्टन्सींग महत्वाचे असून राज्यात आता मरकजसारखा कार्यक्रम नको अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मांडली.

शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, दिल्लीत मर्कजच्या आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी हजारो लोक जमले होते. राज्यातलेही अनेकजण त्या ठिकाणी गेले होते. कार्यक्रमानंतर त्यातील काही लोक इतरत्र गेले. त्यातील काही लोकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊन त्यांनी एकत्र प्रवास केल्याचं नाकारता येत नाही. आता करोनाचा आजार वाढत आहे. आजची स्थिती पाहता आपण काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. असे प्रकार पुन्हा घडता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. मरकजचा सोहळा टाळला पाहिजे होता, असं शरद पवार यावेळी म्हणाले. दरम्यान मुस्लिम लोकांनी घरातूनच नमाज अदा करावी, असं ते म्हणाले. तसंच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी होणारा कार्यक्रमही पुढे ढकलावा अशी विनंती त्यांनी केली.

शरद पवार पुढे म्हणाले की, ९० टक्के लोक सूचनांचं पालन करतायत पण १० टक्के लोकांकडून ते होत नाही. सर्वांनी नियम पाळून सरकारला सहकार्य करावं. लोकं आजही मार्केटमध्ये गर्दी करताना दिसत आहेत. आपल्याकडे भाजीपाल्याची कमतरता नाही. सर्व उपयययोजना असताना त्या मिळणार नाही अशा भावनेनं लोकांनी गर्दी करू नये. सराकरनं ज्या काही सुचना दिल्या आहेत त्या आपण पाळल्या पाहिजेत. राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content