नागपूरच्या महिलेला अश्लिल मॅसेजेस पाठविणाऱ्या संशयिताला जळगावातून अटक

जळगाव प्रतिनिधी । नागपूर येथील एका महिलेच्या मोबाईलवर अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठविणाऱ्या तरूणाला जळगावातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी नागपूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, नागपूर येथील जरीपटका या भागात राहणाऱ्या विवाहितेच्या व्हॉटसॲपवर जळगाव येथील रहिवाशी असलेला संशयित आरोपी गौतम प्रकाश बाविस्कर (वय-२८) रा. शांतीनगर , रामेश्वर कॉलनी याने अश्लिल मॅसेज व व्हिडीओ पाठविले होते. याप्रकरणी नागपूर येथील जरीपटका पेालीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होतो. मोबाईल नंबरची तपासणी केली असता संशयित आरोपी हा जळगाव येथील रहिवाशी असल्याची माहिती नागपूर पोलीसांनी मिळाली. त्यानुसार नागपूरच्या पोलीसांनी जळगाव एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधून संबंधित मोबाईल नंबरची माहिती दिली. मोबाईल नंबरच्या आधारे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, स.फौ. अतुल वंजारी, गणेश शिरसाळे, सुनील सोनार यांनी संशयित आरोपी गौतम बाविस्कर याला राहत्या घरातून अटक केली. पुढील कारवाईसाठी नागपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content