नावरे जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण कक्ष

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नावरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

प्रांतधिकारी डाँ.अजित थोरबोले व यावल पंचायत समिती चे गटविकास अधिकारी निलेश पाटील यांच्या निर्देशानुसार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी हेंमत बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नावरे येथील साकळी प्राथमिक आरोग्य केंद्र चे गटप्रर्वतक लीना पाटील व बचत गटातील महिलांनी मिळून नावरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विलगीकरण कक्षांची स्थापना केली. यावेळी गटप्रर्वतक लिना पाटील यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर गावावरुन येणार्‍या प्रत्येकाला या शाळेतील विलगीकरण कक्ष तयार केला असल्याची माहिती दिली. याप्रसंगी गटप्रर्वतक लिना पाटील,आशा वर्कर जयश्री पाटील,अंगणवाडी सेविका शोभा पाटील,मदतनिस जिजाबाई पाटील,सि.आर.पी.बचत गटाच्या ज्योती पाटील,धनाबाई पाटील,जि.प.शिक्षक सरवर तडवी,ग्रामपंचायत शिपाई रविद्र सावळे आदी उपस्थित होते.

Protected Content