रावेर तालुक्यातील कामांच्या चौकशीची उत्सुकता वाढली

 

रावेर  : प्रतिनिधी |  तालुक्यातील ई-टेंडर व दलितवस्तीच्या कामांच्या चौकशीचे पुढे काय झाले ?,  या उत्सुकतेमुळे चौकशीबद्दल  गुढ वाढले  आहे या चौकशीवरुन जिल्हा परिषदची सभा चांगलीच गाजली होती.

 

रावेर तालुक्यात दलितवस्ती कामांच्या ई-टेंडर मध्ये नियमांची पायमल्ली झाली असा आरोप झाल्यावर  ग्रामसेवक व गट विकास अधिकारी यांच्यावर ताशेरे ओढत जिल्हा परिषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी  जि प  बैठक चांगलीच गाजवली होती.त्यानंतर चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली होती  दुसऱ्याच दिवशी समितीने रावेर पंचायत समितीत दहा तास कामांची व ई-टेंडरच्या कागदपत्रांची पडताळणी केली होती. या समितीला जाऊन अनेक दिवस उलटले परंतु  पुढे काय झाले ? याचे  गूढ वाढले आहे.

 

या ई-टेंडर व दलितवस्तीच्या कामांच्या चौकशी  करण्यासाठी जिल्हा परिषदने सहा जणांची समिती गठीत केली होती. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे , सामान्य प्रशासनाचे बाळासाहेब बोटे , समाज कल्याण विभागाचे विजय रायसिंघे यांच्यासह सहा जणांचा समावेश होता   चौकशी होऊन  महीना उलटला परंतु अद्याप  दोषी कोण हे समजले नाही.

Protected Content