आभोडा येथे तरूणीवर अत्याचार; सहा जणांवर गुन्हा

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आभोडा येथील १९ वर्षीय तरूणीवर शेतात अत्याचार केले तर नातेवाईकांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आभोडा शिवारात राहणारी १९ वर्षीय तरूणी आपल्या आईवडीलांसह राहते. तालुक्यात रामजीपुरा येथील संशयित आरोपी भास्कर नामदेव कावडकर हा आभोडा शिवारातील शेतात कुणीही नसतांना तरूणीवर बलात्कार केला. त्यानंतर पिडीत तरूणीच्या घरासमोर बेकायदेशीर मंडळी जमा करून पिडीत मुलीच्या काकाला शिवीगळा करून मारहाण केली. तसचे घरातील सामांनांची नुकसान केले तर मोटारसायकलची तोडफोड केली आहे. पिडीत तरूणीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी भास्कर नामदेव कावडकर, अमोला अरूण धनगर, महेश रमेश महाजन, आनंदा अशोक कावडकर, ललीत कांतीलाल महाजन आण नितीन पाटील सर्व रा. रामजीपुरा ता. रावेर जि. जळगाव यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे करीत आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.