रावेरात बंद घरफोडून रोकड लांबविली

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी ११ हजाराची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेर शहरातील जुना सावदा रोडवर असलेले माऊली नगर येथील भरत सुरेश पाटील (वय ३०) हे आपल्या परिवारसह वास्तव्याला आहे. ७ डिसेंबर रोजी त्यांचे घर बंद असतांना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून ११ हजाराची रोकड लांबविली. हा प्रकार गुरूवार ८ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी विष्णू भील करीत आहे.

Protected Content